पित्ताशय नसल्याने पुन्हा पचनाचे आजार होतात आणि खाल्लेलं अन्न नीटपणे पचत देखील नाही.काय म्हंणतात डॉक्टर साहेब

पित्ताशय नसल्याने पुन्हा पचनाचे आजार होतात आणि खाल्लेलं अन्न नीटपणे पचत देखील नाही.काय म्हंणतात डॉक्टर साहेब

बदलती आधुनिक जीवनशैली म्हणजे वेगवान जीवन! घड्याळाच्या काट्याला आपलं आयुष्य अडकवून गरगर फिरणं अस काहीस आजच्या जीवनाचं चित्र झालंय. आपल्या नैसर्गिक सवयी मोडून आपण स्वतःला आधुनिक समजत निसर्गाच्या विरुद्ध दिशेने वेगाने वाटचाल करीत आहोत. सोशल मीडियामुळे जग जवळ तर आलंय पण जवळची माणसं मात्र दूर दूर जात आहेत.समाजातला संवाद संपत चाललाय.नवीन पिढी ही ह्या आंतरजालाच्या म्हणजेच इंटरनेटच्या महाकाय जाळ्यात गुरफटून कुटुंबातील सदस्यांपासून दूरावत जात आहे.

 एकेकाळी शेतात काम करणारी माणसं देखील दुपारच्या वेळी जेवायला एकत्र येऊन एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायची. एकमेकांना आधार द्यायची.

   आता मात्र घरातीलच लोकांना आपापसात बोलायला वेळ होत नाहीये.

   त्यामुळे आपल्या जीवनातील अडचणी कोणाशी शेअर करणे कठीण झाले आहे. हा मानसिक तणाव वाढला की त्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम आता प्रकर्षाने दिसू लागले आहेत. पूर्ण शंभर वर्ष आयुष्याची देणगी असलेला माणूस आज पन्नाशीतच अकाली वृद्ध दिसू लागलाय. वेगवेगळ्या आजारांना बळी पडू लागलाय.

   आता ह्या आजारांवर मात करायची असेल तर आपल्याला पुन्हा निसर्गाचीच मदत घ्यावी लागेल. आपल्या पूर्वजांनी घालून दिलेल्या दिनक्रमानुसार वागावे लागेल.आणि तरीही आजारपण आलेच तर नैसर्गिकरित्या निसर्गात उपलब्ध असलेल्या औषधी वनस्पतींचा वापर करून बरे व्हावं लागेल.तरच आपले निरोगी व शतायुषी आयुष्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल.   ह्या आपल्या पारंपारिक जीवनशैलीमधून व सोप्या आयुर्वेदिक युक्त्या वापरून आपले आजार कसे बरे होऊ शकतात हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे…

   आजकाल रात्री उशिरा घरी येणं उशिरा जेवणं हे अगदी सवयीचं झालं आहे.त्यामुळे पित्त तर होतेच पण ह्या पित्ताचा शरीरावर विशेषतः त्वचा आणि केसांवर अगदी वाईट परिणाम दिसून येतो.काळवंडलेला चेहरा आणि पिकलेले केस हे ह्या वाढलेल्या पित्ताचे परिणाम......!

   कालांतराने हा त्रास वाढत जातो.मग लिव्हर मध्ये पित्ताचे खडे बनातात आणि बऱ्याचदा अगदी पित्ताशय काढून टाकण्याची वेळ येते. एवढं करून ही पित्ताशय नसल्याने पुन्हा पचनाचे आजार होतात आणि खाल्लेलं अन्न नीटपणे पचत देखील नाही.

   खरतर ह्याची काहीच गरज नाही.अगदी साध्या सोप्या उपायाने आपण हे पित्ताचे खडे घालवू शकतो.तुमचा विश्वास देखील बसणार नाही इतक्या सहज!!!

   तीन दिवस नियमित सकाळी रिकाम्या पोटी अर्धा कप कारल्याचा रस पिऊन वरून कोमट पाणी प्यायचं....

   सुरुवातीला उलटी किंवा जुलाबाचा त्रास होऊ शकतो पण त्यातूनच हे खडे तीन दिवसात निघून जातात.

ज्यांचे वजन वाढले आहे अशा लोकांनी दोन तीन घोट पाणी दर अर्ध्यातासाने पीत राहिल्यास वजन आपोआप कमी होते.इतरांनीही हा उपाय नक्की करून पाहा निश्चितच तुमची तब्येत अगदी प्रमाणात राहील.

  थायरॉईड ची समस्या उद्भवू नये यासाठी काय करावे हे आपल्या पूर्वजांना नक्की माहीत होते.मंगळसुत्र हे नेहमी गळ्याच्या अगदी जवळ घातले जायचे.त्यातील सोन्याचा स्पर्श आपल्या घशाजवळ सतत होत राहिला तर थायरॉईड ची शक्यता कमी होते.

   असेच छोटे आणि सोपे उपाय आपण ह्या लेखांमध्ये पाहणार आहोत त्यासाठीच वाचत राहा आमची ही लेखमाला!!!