सुंदर काळे लांबसडक केसा साठी उपाय सांगत आहेत डॉक्टर तोडकर सर आवळा कसा उपयोगी आहे

सुंदर काळे लांबसडक केसा साठी उपाय सांगत आहेत डॉक्टर तोडकर सर आवळा कसा उपयोगी आहे

गोष्टी साध्या पण फायद्याच्या

कधी कधी साध्या आणि सोप्या गोष्टी आपल्या खूप उपयोगी पडतात.आणि आपला आयुर्वेद तर अशा गोष्टींची खाण आहे.दैनंदिन जीवनातल्या साध्या आणि सोप्या उपायांनी आपण आपल्या छोट्या मोठ्या समस्या चुटकीसरशी सोडवू शकतो.

उदाहरणच घ्यायचं झालं तर आपल्या केसांपासून घेऊ.सुंदर काळे लांबसडक केस कोणाला नको असतात?पण वाढत्या वयासोबत डोईवरच हे हवंहवंसं वाटणार ओझं गळू लागत आणि मग विरळ केस किंवा टक्कल पडणे असं काहीस चित्र दिसू लागत.

ह्यावर किती सोपा उपाय आहे आयुर्वेदात!

त्रिफळा चूर्ण आणि गुळ  समप्रमाणात एकत्र करून त्याच्या  सुपारी एव्हढ्या गोल गोळ्या करायच्या. रोज रात्री एक गोळी चोखून खायची. आणि नंतर कोमट पाणी पिऊन झोपायचं.! आठवड्यात तुमचे केस दाट होतील!!!

असाच उपाय केस काळे होण्यासाठी सुद्धा आहे बरं का..!

आवळ्याचे चूर्ण लिंबाच्या रसात सरसरीत होइपर्यंत भिजवा आणि हे मिश्रण केसांना सहा ते सात तास लावून ठेवा. कोणत्याही रासायनिक घटकांशिवाय तुमचे केस पूर्ण काळे होतील. हा उपाय नियमितपणे केला तर केस पूर्वीसारखे काळे होतात ते ही कायमचे!!

साध्या गोष्टीसाठी आपण दवाखान्यात जातो आणि आजार बरा होण्याची वाट पाहतो.

अगदी खोकलाच घ्या ना....

हा खोकला आपली तर झोप उडवतोच पण घरातील इतरांनाही आपल्यामुळे त्रास होतो.

पण ह्यावर देखील उपाय आहे बर का! तोही साधा स्वस्त आणि नैसर्गिकरित्या....

रोज रात्री गरम दुधात दालचिनीची पावडर टाकून ते दूध प्या व झोपा....

खोकला गायब.....

असे कितीतरी साधे सोपे उपाय आहेत फक्त ते आपल्याला माहीत हवेत...!!

त्यासाठीच हा लेखनप्रपंच......

तेव्हा वाचत राहा ही लेख माला......

कारण म्हटलेच आहे ना..."वाचाल तर वाचाल.