रात्रीच्या वेळेस तुमचं सौंदर्य खुलवा

रात्रीच्या वेळेस तुमचं सौंदर्य खुलवा

1.दिवसभराच्या थकव्यानंतर रात्रीची 8 तासांची शांत झोप निरोगी स्वाथ्यासाठी फार महत्त्त्वाची आहे. मात्र सौंदर्य निखारण्याची जादुई क्षमतादेखील याच रात्रीत आहे. मग पहा , तुमचे सौंदर्य वाढवण्यासाठी रात्रीच्या वेळेस काय कराल ...

2.झोपण्यापुर्वी आंघोळ केल्याने शरीर हायड्रेट रहायला मदत होते. त्यामुळे शक्य असेल तर नक्की थंड पाण्याने आंघोळ करा. यामुळे रक्तपुरवठा सुधारतो तसेच विषारी घटकही शरीराबाहेर पडण्यास मदत होते.

3.रात्रीची झोप तुमच्या केसांचे आरोग्य वाढवण्यासाठी देखील फार मदत करते. रात्री झोपताना सॅटीन किंवा सिल्कची उशीची कवरं घातलेल्या उशांवर झोपा. यामुळे केस फिझी होण्यापासून तुमचा बचाव होतो. तसेच रात्रीच्या वेळेस केस धुवून झोपा म्हणजे ते सुकवण्यासाठी ‘हेअर ड्रायर’चा वापर करण्याची गरज पडणार नाही. केसांवर ‘leave-in conditioner’ चा वापर करा आणि दुसर्याा दिवशी मऊ व चमकदार केस मिळवा.

4.केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी , त्यांना मुळापासून तेल लावा. तेल लावल्याने केसांची शुष्कता दूर होते व वाढ अधिक जोमाने वाढ होण्यास मदत होते.

5.रात्रीच्या वेळेस त्वचेला देखील आराम करण्याची गरज असते. झोपण्यापुर्वी चेहरा क्लिनजिंग मिल्कने स्वच्छ करा. तसेच झोपण्यापुर्वी मेक अप रिमुवरने किंवा बेबी ऑईलने सारा मेक अप काढून टाका. चेहर्या ला व हात-पायांना मॉइश्चररायझर क्रिम लावून , हलकासा मसाज करून झोपा.

6.रात्रीच्या वेळेस घाईघाईत नखं कापण्याची , साफ करण्याची घाई करू नका. नखं मऊ व आरोग्यदायी करण्यासाठी त्यावर पेट्रोलियम जेली किंवा क्युटिकल क्रिमचा वापर करा. नखं अजून थोडी आकर्षक करण्यासाठी ती 2- 3 मिनिटं ऑलिव्ह ऑईलच्या तेलात बुडवून ठेवा.

7.तुमच्या पायांना आणि टाचेला देखील रात्रीच्या वेळेस विशेष आरामाची गरज आहे. रात्री झोपण्यापुर्वी पायांना मॉइश्चररायझर क्रीम लावून मसाज करा. तसेच झोपताना सॉक्स घाला परंतू विशेष काळजी घ्या. कारण क्रीममुळे फंगल इंफेक्शन होण्याचीही शक्यता असते.

8.रात्री झोपण्यापुर्वी हळदीचे दुध प्या. जंतूनाशक व सौंदर्यवर्धक हळद रक्त शुद्ध करण्यास मद्त करते. त्याच्यामुळे विषारी घटक शरीराबाहेर टाकले जातात व त्वचेचा पोत सुधारतो.