
वजन वाढवायचे उपाय
वजन वाढवायचे उपाय
1) दुध :
दुधातून प्रामुख्याने मिळणारी प्रोटिन्स व कर्बोदके तसेच इतर पोषणद्रव्ये यांमुळे वजन वाढवण्यास मदत होते. १०० मिली दुधातून अंदाजे ३.४ ग्राम प्रोटिन्स मिळतात आणि रोज २ ग्लास दुध प्यायल्यास तुम्ही १४ ग्राम प्रोटिन्स सेवन करू शकता.
2) अंडी:
अंड्यांच्या सेवनाने देखील शरीराला उच्च प्रतीचे प्रोटिन्स मिळतात. १०० ग्राम अंड्याच्या सेवनाने अंदाजे १३ ग्राम प्रोटिन्स मिळतात . अंड्यातील ‘व्हिटामिन ए’ व ‘व्हिटामिन बी १२’ चा आहारात समावेश हितावह आहे.
3) ओट्स :
वजन कमी करण्यासोबतच वजन वाढवणाऱ्यासाठी देखील ओट्स चा आहारात वापर असणे आवश्यक आहे. ओट्समधून शरीराला फायबरचा पुरवठा होतो. १०० ग्राम ओट्स मधून १७ ग्राम प्रोटिन्स मिळतात. ओट्स मधून शरीराला आयर्न (लोह) देखील मिळतात .
4) केळ :
वजन वाढवण्यासाठी केळ खाण्याचा सल्ला दिला जातो . एका केळ्यातून १०५ कॅलरीज मिळतात ज्या तुम्हाला तात्काळ उर्जा देतात. व्यायामानंतर शरीराची झीज भरून काढण्यास मदत होते. बऱ्याचदा टेनिसपटू ब्रेकमध्ये उर्जा मिळवण्यासाठी केळ खात असल्याचं तुम्ही पाहिलच असेल !
5) बटाटा :
जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर तुमच्या आहारात किमान ४० % घटकांपासून कर्बोदक असतील अशा पदार्थांचा समावेश करा. तुमच्या आहारात बटाट्याचा समावेश वाढवा. बटाट्यातील ‘ग्यूटामिन ‘ व ‘ अर्जीनीन ‘ यासारखी अमिनो अॅसिड वजन वाढवणाऱ्यांसाठी हितावह आहे. बटाट्याचा वापर सालीसकट केला तर ते जास्त फायदेशीर राहील.
6) सोयाबीन :
वजन वाढवण्यासाठी लागणारी कर्बोदक पुरेशी मिळवण्यासाठी तुम्ही सोयाबीनचा रोजच्या आहारात समावेश करू शकता. रोजच्या १०० ग्राम सोयाबीन सेवनाने तुम्हाला ३६ ग्राम प्रथिने मिळू शकतात. गव्हाच्या पिठात तुम्ही सोयाबीनचे पीठ एकत्र करून पोळ्या केल्यास आपोआप तुम्ही सोयाबीनचा रोजच्या आहारात समावेश करून घेऊ शकता.
7) नुडल्स :
नुडल्स खाणं हे काहीसं धोकादायक समजलं जात, मात्र यामधून तुम्हाला कर्बोहायड्रेट व कॅलरीज मिळू शकतात. तसेच नुडल्समध्ये भाज्या टाकून खाल्याने तुम्हाला अनेक पोषणद्रव्ये याचबरोबरीने व्हिटामिन्स व अॅन्टीऑक्सिडन्ट मिळतील.
8) मांसाहार ( चिकन ) :
शाकाहाराप्रमाणेच मांसाहार देखील घेणे फायदेशीर आहे. चिकन खाणे केवळ चविष्ट नसून १०० ग्राम सेवनातून २५ ग्राम प्रोटिन्स तुम्हाला मिळू शकतात . महिन्याभराच्या नियमित सेवनाचा तुम्हाला नक्कीच तात्काळ परिणाम दिसून येईल.
9) लोणी :
जर तुम्हाला लोणी खायला आवडत असेल तर वजन वाढवण्यासाठी तुम्ही लोण्याचा तुमच्या आहारात नक्कीच समावेश करून घेऊ शकता. लोण्यातून तुम्हाला मुबलक प्रमाणात मेद मिळू शकतात. १०० ग्राम लोण्यातून तुम्हाला ८१ ग्राम मेद मिळू शकेल.
10) सुकामेवा :
काजू, बदाम ,अक्रोड , किसमिस यासरख्या तात्काळ कॅलरीज देणारा सुकामेवा आहारात ठेवा. फळांपेक्षा सुकामेवा खाणे हा वजन वाढवण्याचा एक हेल्दी उपाय आहे. फळांपेक्षा सुक्यामेव्यातून शरीराला अधिक कॅलरीज व पोषणद्रव्ये मिळतात.