चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

1. आलं पोटावरील वाढलेली चरबी कमी करण्यासाठी उपयोगी ठरते. त्यामुळे आल्याचा आहारात वापर करावा. आलं इतरही समस्यांसाठी उपयुक्त असल्याने त्याचा अपाय होत नाही. मात्र पदार्थामध्ये आलं घालण्याबरोबरच आलं आणि तुळस घातलेला चहा आरोग्याला जास्त चांगला असतो.

2. जवळपास सर्व भारतीय स्वयंपाकघरात मूगडाळ असते. या डाळीमध्ये ए,बी,सी आणि ई ही जीवनसत्त्वे असतात. याशिवाय कॅल्शियम, आयर्न आणि पोटॅशिअम यासारखी खनिजेही मूग डाळीतून मिळतात. याशिवाय मूग डाळीत प्रथिने आणि फायबरचे प्रमाणही जास्त असल्याने वजन कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. मूग डाळीने लवकर पोट भरते त्यामुळे अनावश्यक खाणे टाळले जाते. याचा वजन आणि विशेषतः पोट कमी होण्यास उपयोग होतो

3. जेवणानंतर जीरं, ओवा आणि बडिशेप यांची पूड खावी. त्यामुळे अन्नपचन चांगले होऊन वजन कमी करण्यास मदत होते. हे मिश्रण कोमट पाण्यातून घेतल्यास त्याचा जास्त चांगला फायदा होतो.

4. सकाळी उठल्यानंतर काळीमिरी घालून टोमॅटोचा रस प्यायल्यास त्याचाही पोटावरील चरबी घटण्यास उपयोग होतो. मात्र हा रस घेतल्यानंतर काहीच खाऊ नये. याचा निश्चितच फायदा होतो.

5. काकडी सॅलेड म्हणून तर चांगली असतेच पण पोटाचा घेर कमी करण्यासाठी काकडीही उपयुक्त असते. काकडीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असल्याने अन्नाचे पचन होण्यास मदत होते. यामुळे पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते. मात्र यासाठी जेवणाच्या आधी काकडी खावी. यामुळे पोट भरलेले राहील्याने जेवण कमी जाते.

6. सूर्यनमस्कार, वक्रासन, पश्चिमोत्तानासन, भुजंगासन, क्रंचेस यामुळेही पोट कमी होण्यास मदत होते. त्यामुळे आहारात विविध गोष्टींचा समावेश करण्याबरोबरच व्यायाम करणेही तितकेच महत्त्वाचे असते.