बाळाची छाती भरणे ,शुगर वर उपाय ,सीताफळ ,मोहरी आणि मध सुंठ पूड आणि दालचिनीची पूड  डॉ स्वागत तोडकर

बाळाची छाती भरणे ,शुगर वर उपाय ,सीताफळ ,मोहरी आणि मध सुंठ पूड आणि दालचिनीची पूड डॉ स्वागत तोडकर

आपणं मागील काही भागापासून निसर्गोपचार आणि नैसर्गिक जीवनपद्धती बद्दल चर्चा करत आहोत.व्यस्त जीवन आणि धकाधकीची आपली जीवनशैली यामुळेच आपण शरीराकडे पुरेस लक्ष देत नाही आणि नंतर गंभीर आजारांना बळी पडत आहोत.हे सर्व टाळायला हवे.ह्या बाबतीत कोल्हापूरचे डॉ.स्वागत तोडकर हे प्रचंड मेहनतीने काम करत आहेत.असंख्य आजारांना साध्या व सोप्या उपायांनी बरे कसे करावे ह्या माहितीचा खजिनाच त्यांच्या कडे उपलब्ध आहे आणि तो सर्वाना मिळावा म्हणून आजही त्यांची धडपड सुरू आहे.आजकाल डायबेटीस हा आजार भारतात फार मोठ्या प्रमाणात पसरत चालला आहे. ह्यावरील पथ्य व उपचार दोन्ही गोष्टी अत्यंत कठीण व महागड्या होत चालल्या आहेत आणि इतके करूनही आजार पूर्ण बरा होईल ह्याची खात्री कोणताच डॉक्टर देऊ शकत नाही.आयुष्यभर ह्या आजारावर गोळ्या सुरू ठेवाव्यात लागतात. परंतु साध्या व सहज उपायाने हा आजार देखील पूर्ण बरा होऊ शकतो.

 सीताफळाचे झाड आपल्या आजूबाजूला सहज बघायला मिळते.त्याची चार कोवळी पाने मिठाच्या पाण्यात भिजत ठेवून नंतर ती चावून खाल्ल्याने 3 महिन्यात शुगर पूर्णपणे नियंत्रणात येते.

 किती सहजपणे करता येण्यासारखा आहे हा उपाय...! आपल्या निसर्गात प्रत्येक गोष्टीला औषध आहेच.पशूपक्षी मोकळ्या वातावरणात आयुष्य काढतात.ऊन वारा पाऊस सर्वांना सामोरे जातात.पण त्यांना असे आजार कधी झालेले ऐकलय का?

 नाही..... कारण ते निसर्गाच्या नियमानुसार चालतात.आपणदेखील आपले जीवन असच निरोगी बनवू शकतो.त्यासाठी आपल्याला निसर्गाचे हे गुणधर्म माहीत असायला हवेत.

तेच काम डॉ.तोडकर आज सर्वांसाठी करत आहेत......नैसर्गिकरित्या आजारपणं बर कस करायचं हे ते आपल्याला अगदी सोप्या भाषेत सांगत आहेत मात्र आपण ते समजून घेतलं पाहिजे.

 

  पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात लहान बाळांची छाती कफाने भरते आणि त्याला श्वास घेणे सुद्धा कठीण होते.त्यासाठी एक उत्तम उपाय आहे. चमचाभर मोहरी ठेचून बारीक करा आणि त्यात मधाचे दोन थेंब टाका.

त्याचा फक्त वास बाळाला द्या.झटकन छाती मोकळी होते. हाच उपाय म्हाताऱ्या व्यक्तींच्या बाबतीतही प्रभावी आहे बर का!...

सुंठ पूड आणि दालचिनीची पूड एक एक चमचा घेऊन तीन कप पाण्यात उकळून घ्या.

ते पाणी एक कप झाल्यावर सकाळी संध्याकाळी चमचा चमचा घ्या.जुनाट सर्दी खोकला सहज बरा होतो.

हे घरगुती उपाय आहेत.फक्त ते आपल्याला माहीत असले पाहिजेत. ही माहिती आपल्याला देण्यासाठीच ही लेखमाला आम्ही सुरू केली आहे.