शेळीचे  दुध,गुडघेदुखी ,एरंडेल तेल, पांढरे तीळ ,कढीपत्ता आणि काली खारीक  याचा काय उपयोग सांगत आहेत स्वागत सर

शेळीचे दुध,गुडघेदुखी ,एरंडेल तेल, पांढरे तीळ ,कढीपत्ता आणि काली खारीक याचा काय उपयोग सांगत आहेत स्वागत सर

पशूपक्षी निसर्गाच्या सानिध्यात राहू आपले सर्व आजार कसे बरे करू शकतात हे आपण खूप वेळा अनुभवले असेल.

 

शेळी सर्व प्रकारचे गवत झाडपाला खाते त्यामुळे शेळीच्या दुधात अनेक औषधी गुणधर्म असतात.लहान बाळांसाठी शेळीचे दूध अत्यंत पौष्टिक मानले जाते.

 

शेळीचे दूध तीन महिने सकाळी संध्याकाळी डोळ्यात सोडले असता तिरळेपणा सुद्धा बरा होतो इतकी शक्ती त्या दुधामध्ये असते.

आजकाल आढळणारा अजून एक आजार म्हणजे हाडांची दुखणी...! वयाच्या चाळीशीत गुडघेदुखी पाठदुखी कंबर दुखी यांनी त्रस्त असलेले लोक आपल्या आजूबाजूला आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत.

 यावर देखील असेच नैसर्गिक उपचार आपण प्रभावी पणे करू शकतो ते ही कोणत्याही खर्चाशिवाय.!!

एरंडेल तेल आपल्या भाकरी अथवा पोळीच्या पीठात मिसळून भाकरी पोळ्या बनवा. ह्याने पोट तर साफ होतेच शिवाय पचन सुधारते, जंत असतील तर पडतात आणि महत्त्वाचे म्हणजे यातून हाडांना वंगण मिळते त्यामुळे गुडघेदुखी सारखे त्रास कमी कमी होत जातात.

 

 पांढरे तीळ रोज सकाळी चमचाभर घेऊन चावून खाल्ले तरीदेखील गुडघेदुखी आटोक्यात येते.सलग तीन महिने हा उपाय करून पाहा तुमचा तुम्हालाच फरक जाणवेल.

  असे कितीतरी उपाय आपल्या घरातच आपल्याला मिळून जातात फक्त त्याची योग्य माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे.

कढीपत्ता हे तर आपल्या जेवणात नेहमी वापरलं जाणार औषध..!हे कितीतरी आजारांवर औषध आहे ते वाचून तुम्ही थक्क होऊन जाल.

 मधुमेही रुग्णांनी कढीपत्त्याची दहा-बारा कच्ची पाने दिवसातून तीनदा चावून खावीत. याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित रहायला फार मदत होते. कोलेस्टेरॉल वाढले असेल तर, कढीपत्त्याची वीस पाने अनशापोटी चावून खावीत.

    काळ्या खारकेची पावडर करून दुधातून घेतली असता हाडे तर मजबूत होतातच शिवाय किडनी आणि कॅन्सर सारख्या आजारात देखील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 

भरपूर उपाय आहेत आपल्या आजूबाजूला ..! त्यांचा वापर करून आपले जीवन अधिकाधिक निरोगी आनंदी करणे आपल्याला सहज शक्य आहे.

  आपल्या चेहऱ्यावरचे हास्य देखील उपायांचाच एक भाग आहे बार का..हे तर निसर्गाने आपल्याला दिलेलं एक वरदानच मानलं पाहिजे.

साध्या हसण्याने आपले स्नायू मोकळे होतात रक्तदाब कमी होतो,ब्लॉकेजेस कमी होतात आपण सतत उत्साही राहतो.

  अशाच पद्धतीने योग्य जीवनशैली स्वीकारून आपण आपल्यात सुधारणा नक्की घडवून आणू शकतो.

त्यासाठी हवी फक्त इच्छाशक्ती.......