निसर्गाच्या पिशवीतील काही घरगुती उपाय:

निसर्गाच्या पिशवीतील काही घरगुती उपाय:

निसर्गाच्या पिशवीतील काही घरगुती उपाय:

मानवाने एवढी प्रगती केली तरी अजून आपल्याला ह्या निसर्गाची असीम जाणीव झालेली नाही, ह्या निसर्गामध्ये छोट्याश्या आजारापासून ते मोठे-मोठे आजार बरी करण्याची ताकद आहे आणि याच निसर्गाच्या पिटाऱ्यामधून काढलेले काही घरगुती उपाय खाली दिलेले आहेत. यासर्व उपायांचा वापर करून आपण सुद्रुढ व निरोगी राहू शकतो.   

 

  • उष्णता आणि शुगरच्या त्रासासाठी: घरच्या सभोवताली असलेल्या मेहंदीच्या झाडाची पाने मिठाच्या पाण्याने धुवून खाल्ल्यास हे दोन्ही आजार काही दिवसात कमी होतात. 

 

  • अपचन व करपट ढेकराच्या त्रासासाठी: आलं किसून त्यात लिंबू पिळून घेतल्यास हा आजार काही तासात कमी होतो. 


 

  • लूस मोशनच्या त्रासासाठी: मेथीची दाणे कोमट पाण्याबरोबर घेतल्यास लूस मोशन त्वरित कमी होतात. 


 

  • मूत खडाच्या त्रासासाठी: दगडी पानांचा रस सकाळी व संध्याकाळी काही दिवस घेतलयास हा आजार लवकर बरा होतो.

 

  • अंगावरती सूज आल्यास: बेलाच्या पाण्याचा रस किंबहुना वाटीभर सकाळ, दुपार आणि संध्याकाळी घेतल्यास एका दिवसातच हा आजार बरा होईल. 

 

  • चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी: तुळशीच्या पानांचा लेप करून चेहऱ्याला लावावे आणि अर्ध्या तासानंतर धुतल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या काही दिवसात कमी होतात. 


 

  • घरामधील डास कमी करण्यासाठी: गाईच्या शेणामध्ये तूप मिसळून ते मिश्रण वाळवून घरात त्याचा धूर करावे यामुळे त्वरित घरातील दास नाहीसे होतात. 

 

  • उंदीर, पाल व इतर डास कमी करण्यासाठी: वरील वाळवलेल्या मिश्रणाबरोबर निरगुंडीची पानांचा धूर केल्यास उंदीर, पाल व इतर डास नाहिसे होतात. 


 

  • रक्ताची शुद्धी करण्यासाठी: रोज दिवसाला ५-७ पाने धुवून खाल्ल्यास तुमच्या रक्तातील अशुद्धी कमी होते व त्यामुळे उद्भणारे सर्व आजार नाहीसे होतील. 

 

(कृपया आजार गंभीर असल्यास त्वरित डॉक्टरांची सल्ला घ्यावी)