सुद्रुढ आयुष्यसाठी काही महत्वाच्या गोष्टी:

सुद्रुढ आयुष्यसाठी काही महत्वाच्या गोष्टी:

सुद्रुढ आयुष्यसाठी काही महत्वाच्या गोष्टी:

 

सुद्रुढ आणि निरोगी राहणे हि पण एक कलाच आहे आणि काही गोष्टींचा आपल्या जीवनात समावेश करून आपण ह्या कलेला अंगीकृत करू शकतो. खाली दिलेल्या अश्याच काही युक्त्या आणि टीपा आहेत ज्यांचा आपण आपल्या जीवनात समावेश करायला पाहिजे. 

 

  • धकाधकीच्या जीवनात हृदय सुदद्रुढ राहणे आवश्यक आहे पण आजकाल हृदयाचे आजार खूप वाढत चाललेले आहेत. पण लसूण हृदयासाठी अत्यंत गुणकारी आहे. जर आपण रोज एक लसूणाची कळी खाल्ल्यास हृदय मजबूत व निरोगी राहते. म्हणून रोज आपण लसूणाचा जेवणात वापर करावा. 

 

  • पचन आणि गॅसेसचे आजार आजकाल खूप वाढत आहेत. वेलदोडा खाणे यावर अत्यंत सोपी पण रामबाण उपचार आहे. 

 

 

  • तळलेले व डबाबंद असलेल्या अन्न पदार्थामुळे कोलेस्ट्रॉलचे आजार खूप वाढत आहेत. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी पिंपळाच्या पानांचा रस काढावा, गाळून तो पाण्याबरोबर प्यावा. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी करण्यात बरीच मदत मिळते. 

 

 

  • वाढत्या प्रदूषण आणि कामाच्या व्यापामुळे थकवा जाणवणे हे स्वाभाविक आहे. हा थकवा कमी करण्यासाठी अशोकाच्या पानांचा रस काढून, पाण्याबारोबर घेतल्यास थकवा नाहीसा करण्यात बरीच मदत मिळेल. 

 

 

  • व्यायाम आणि योगासने करणे कुठल्याही रोगासाठी फायदेशीर आहे परंतु ज्यांना शुगरचा आजार आहे त्यांनी नेमाने रोज २-३ की. मी. चालावे. शुगरसारख्या आजारासाठी व्यायाम आणि चालणे औषधाइतकंच महत्वाचं आहे. 

 

 

  • खाण्या-पिण्याच्या सवयीत झालेल्या बदलामुळे बऱ्याच लोकांनां वजनवाढीचा त्रास होत आहे. पण जर का आपण प्रत्येक काही मिनिटात पाणी पित राहलो तर वजन कमी करण्यात बरीच मदत मिळते. 

 

अश्या छोट्या पण दर्जेदार युक्तींचा जर आपल्या जीवनात वापर केल्यास सुद्रुढ, मजबूत आणि निरोगी राहण्यास बरीच मदत मिळते.  

(कृपया आजार गंभीर असल्यास त्वरित डॉक्टरांची सल्ला घ्यावी)