मोस घालवण्याचे सहा प्रभावी उपाय

मोस घालवण्याचे सहा प्रभावी उपाय

सुंदर निरोगी शरीर ही खरोखरच एक फार मोठी संपत्ती आहे.आपण आपलं हे शरीर सुंदर व निरोगी राहावे यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतो आणि ते केले देखील पाहिजेत.

   मात्र काही गोष्टींमुळे आपल्या सौंदर्यात बाधा येऊ शकते आणि मग आपण चिंताग्रस्त होतो.असाच एक प्रकार म्हणजे मेस मस्स किंवा चामखीळ...!

ह्यामुळे खरतर आपल्याला त्रास असा काही होत नाही पण ह्यांच्या असण्याने आपलं सौंदर्य मात्र कमी होऊ शकत.तर हे मोस किंवा मस्स घालवण्याचे काही उपाय आज आपण पाहणार आहोत.

  1. सफररचंदाचे व्हिनेगर हा मोस घालवण्यासाठी प्रभावी उपाय आहे.मोस असलेल्या जागी सफररचंदाचे व्हिनेगर कापसाने लावावे व नंतर तो कापूस पट्टीने तिथेच बांधून ठेवावा.असे ४ ते ५ दिवस केले असता मोस आपोआप गळून पडतो.

  2. दुसरा एक उपाय म्हणजे लिंबाचा रस..! वरीलप्रमाणेच मोस असलेल्या ठिकाणी कापसाने लिंबाचा रस  व कापूस पट्टीच्या साह्याने त्या जागी बांधून ठेवावा.३ ते ४ दिवसांत मोसाचा रंग बदलतो व ६ ते ७ दिवसात तो गळून पडतो.

  3. तिसरा उपाय अगदी घरगूती स्वरूपाचा आहे तो म्हणजे बटाट्याची सालं किंवा बटाट्याचा रस..! वरीलप्रमाणे हा रस मोस असलेल्या ठिकाणी लावा किंवा बटाट्याची साल चकती करून त्या जागी फिरवून ती साल पट्टीने मोसावर बांधून ठेवा.७ ते ८ दिवसात मोस गळून जाईल.

  4. पुढील उपाय म्हणजे अननसाचा रस..! हा रस देखील वरील प्रमाणेच कापसाने लावायचा आहे आणि नंतर तो कापून त्या जागी बांधून ठेवा.३ ते ४ दिवसात मोस चा रंग बदललेला तुम्हाला दिसून येईल व ७ ते ८ दिवसात मोस पुर्णपणे गळून जाईल.अननसाच्या रसामध्ये अस एंझाईम असत जे मोस घालवू शकत.हेच एंझाईम मध आणि कांद्याच्या रसात देखील आढळून येते व ह्यामुळे देखील मोस घालवता येतो.

  5. बेकिंग सोडा हा देखील असाच त्वचेसाठी उपयुक्त पदार्थ आहे.बेकिंग सोडा व एरंडेल तेल एकत्र करून त्याची पेस्ट मोस असलेल्या ठिकाणी लावल्यास 2 दिवसात मोस नाहीसा होतो.

  6. कांद्याप्रमाणेच लसूण देखील त्वचेवर अत्यंत उपयुक्त औषधी आहे.लसणाची पाकळी मोस असलेल्या जागी चुरडून फिरवा व नंतर तिथेच पट्टीने बांधून ठेवा.हा उपाय आठवडाभर करून पाहा.ह्याने देखील मोस निघून जातो.

   तर असे आहेत मोस घालवण्याचे सहज सोपे साधे उपाय!!!

नक्की करून पाहा....