डोकेदुखी ,केस अकाली पांढरे होणे,तरुण दिसावं,शरीरातील उष्णता ,अॅलर्जी

डोकेदुखी ,केस अकाली पांढरे होणे,तरुण दिसावं,शरीरातील उष्णता ,अॅलर्जी

जेव्हा आपण डोकेदुखीने बेजार झालो असतो तेव्हा सरळ सरळ पेन किलरची गोळी घेतो परंतु डोकेदुखी आपण एका मिनिटात थांबवू शकतो त्यासाठी चिमूटभर मीठ जिभेवर ठेवा ,अर्धा मिनिटानंतर अर्धा ग्लास पाणी प्या असे केल्याने डोकेदुखीपासून त्वरित आराम मिळतो

हल्ली बरेच लोक केसाच्या अनेक समस्यांनी त्रस्त आहेत जसे केस गळती ,टक्कल पडणे ,केस अकाली पांढरे होणे या व अशा अनेक समस्यांनी त्रस्त असलेले लोक महागडे उपचार घेतात पण फरक मात्र जाणवत नाही. याच्यावरही आयुर्वेदात घरगुती उपाय सांगितला आहे जो खूप प्रभावशाली आहे. त्यासाठी 21 तुळशीची पाने घ्या आणि त्यात तीन ते चार चमचे आवळा चूर्ण घाला हे मिश्रण 15 ते 20 मिनिटे पाण्यात भिजत घाला आणि नंतर केसांच्या मुळांन पर्यंत सगळीकडे मसाज करा. मसाज केल्यानंतर एक दीड तासानंतर आंघोळ करा असे आठवड्यातून कमीत कमी एक वेळा आणि जास्तीत जास्त दोन वेळा आपणास हा उपाय करायचा आहे. ज्या दिवसापासून उपाय कराल त्या दिवसापासून आपल्याला फरक दिसेल.

आपण तरुण दिसावं असे वाटणे स्वाभाविक आहे पण तरुण दिसण्यासाठी कुठल्याही प्रकारचा मेकअप करण्याची गरज नाही, त्यासाठी तुळशीच्या पाण्याचा रस पूर्ण चेहऱ्याला लावायचा असे केल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या निघून जातात

उन्हाळ्यामध्ये किंवा इतर दिवसातही शरीरातील उष्णता कमी करायचे असेल तर त्यासाठी एक सोपा उपाय आहे लिंबूची साल डोक्यावर ठेवल्यास उष्णता वाढत नाही आणि शरीरात थंडावा जाणवतो

कुठल्याही प्रकारच पदार्थ खाल्ल्याने अॅलर्जी होत असेल तर त्यासाठी रोज आंब्याचे एक पान खा पान (तोंडात टाकून चघळून चघळून खा) केल्याने अॅलर्जी होत नाही