
केस गळती वर आयुर्वेदिक उपचार-Hair Fall home remedies
केस गळती वर आयुर्वेदिक उपचार:
1.आवळ्यामध्ये असतात खनिजे (मिनरल्स), व्हिटॅमिन सी जीवनसत्त्व आणि अँटी ऑक्सिडंट्स. त्यात असते क जीवनसत्त्व ज्यामुळे केस बनतात निरोगी आणि चमकदार. आवळा पावडर, मेहंदी पावडर आणि दही एकत्रित करून,केसांना लावा. ते २ तास ठेवून केस धुवावेत.
2.कडुनिंब वापरा-कडुनिंबाने डोक्याच्या त्वचेचे रक्ताभिसरण सुधारते आणि मुळापर्यंत जाऊन केसांची वाढ सुधारते. अंघोळीच्या पाण्यात कडुनिंबाचे पानं घालावे आणि त्यानेच अंघोळ करावी आणि केस धुवावेत. कालांतराने केसांचे गळणे कमी होईल.
3.खोबऱ्याच्या तेलाचे फायदे आपण बरेचदा विसरतो. केसांच्या मजबुतीसाठी खोबऱ्याचे तेल खूप फायदेशीर आहे. रोज जर आपण खोबऱ्याच्या तेलाने १५ मिनिटे केसांना मालिश केली तर केस रेशमी तर होतीलच पण केस गळणे सुद्धा थांबेल.
4.मध केसांच्या पोषणासाठी उत्तम आहे. ह्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते. जर मधाबरोबर अंड्याचा बलक मिसळला तर त्याचा परिणाम दुप्पट होतो. केसांच्या मुळाला म्हणजेच डोक्याच्या त्वचेला ह्यामुळे आवश्यक प्रथिने किंवा केरोटीन मिळते.
5.जर वाढते टक्कल तुमची झोप उडवत असेल तर कोरफड हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. कोरफडचा गर आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळा. यामध्ये २ चमचे खोबरेल तेल टाका आणि चांगले मिसळा. केसांच्या मुळांशी या मिश्रणाने मालिश करा आणि २० मिनिटे थांबा. नंतर केस पाण्याने धुवून टाका.
6.बटाट्याच्या रसाबद्दल खूप कमी लोग जाणतात. बटाट्याचा रस केस गळणे थांबवतो आणि त्यांना मजबूत बनवतो. डोक्याच्या त्वचेला बटाट्याचा रस लावा आणि १५ मिनिटांनंतर केस धुवा. बटाट्यामधील जीवनसत्व तुमचे केस लांब आणि मजबूत करते.
7.ग्रीन टी, यामध्ये भरपूर प्रमाणात एंटीऑक्सीडेंट असतात म्हणून हे केसांच्या समस्यांवर खूप परिणामकारक असते. तसेच ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पॉलीफेनॉल्स सापडतात जे केसांच्या वाढीसाठी उपयुक्त असते. ग्रीन टीच्या दोन पुड्याना एक कप गरम पाण्यामध्ये बुडवून मिश्रण तयार करा. आता ह्या पाण्याने डोक्याची त्वचा धुवा. केस गळती थांबवण्यासाठी सुद्धा तुमच्या नित्याच्या आहारात सुद्धा ग्रीन टी समाविष्ट करा. 8.केसांची जास्त स्टाइलिंग करण्याने केसांचे खूप नुकसान होते. मशीनच्या सह्हायाने केस कुरळे करणे, सरळ करणे, रासायनिक ब्लीच, रंग, आणि जास्त प्रमाणात जेल लावण्याने केसांचे खूप नुकसान होते. हेयरजेल आणि हेयरस्प्रे चा उपयोग खूप करू नये.
9.खरतर केसांच्या समस्यांचे एक प्रमुख कारण तणाव सुद्धा आहे. म्हणून तुमच्या आयुष्यातून भावनिक आणि शारीरिक तणाव दूर करण्याचा प्रयत्न करा. मोकळ्या हवेत फिरावे आणि काही व्यायाम सुद्धा करावा. सोबतच पूर्ण झोप घ्या आणि एक निरोगी जीवनशैली आत्मसात करा.
10.नारळ-केसांना पोषण देण्यात नारळ खूप उपयोगी आहे. नारळाचे तेल कोमट करून केसांच्या मुळात मसाज केल्याने पोषण मिळतं आणि केस मजबूत होतात. तेल कमीत कमी एक तास तरी केसांमध्ये लावून ठेवावे. याव्यतिरिक्त नाराळाचे दूध केसांमध्ये लावून मसाज करून एक तासानंतर केस धुतल्याने फायदा होतो.
11.जास्वंद-जास्वंदाचे लाल फूल केसांसाठी वरदान आहे. हे पिसून नारळाच्या तेलात मिसळून केसांना 1 तास तरी लावून ठेवावे. नंतर केस धुऊन याका. याने डैंड्रफपासून मुक्ती मिळते आणि केस चमकदार होतात.