घरगुती उपचार : Honey , Butter Milk
मध :
त्वचेचं क्लिंन्जिंग करण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे मध.. मधाच्या वापरामुळे त्वचा कोमल बनते आणि उजळतेही. यामुळे चेहरा, हातापायाची चमक कायम राहते.
ताक :
ताक तुमच्या त्वचेतून डेड स्किन सेल्स बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते. त्यामुळे तुमची त्वचाही एव्हरयंग दिसते. एक सुती कपडा घेऊन तो थंड ताकात बुडवा आणि या कपड्यानं आपला चेहरा ५ ते १0 मिनिटांपर्यंत झाकून ठेवा.. त्यानंतर थंड पाण्यानं चेहरा धुऊन घ्या.
ऑलिव्ह ऑईल :
गेल्या अनेक वर्षांपासून ऑलिव्ह ऑईल मॉइश्चघरायजर म्हणून वापरलं जातं. यामध्ये लेवेंडर असेन्शियल ऑईलचे काही थेंब टाकून आंघोळीच्या पाण्यात वापरा.. त्यामुळे तुमची त्वचा मुलायम होण्यास मदत होते.
नारळाचं तेल :
नारळाचं तेल खूप चांगलं मॉइश्चहरायजर असतं. हे तेल प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी लाभदायक ठरतं. नारळाचं तेल वापरल्यानं अवेळी त्वचेवर सुरकुत्या दिसून येत नाही. दोन चमचे नारळाचं तेल, एक चमचा मध आणि एक चमचा संत्र्याचा रस मिसळून त्वचेवर लावा. त्यानंतर कोमट पाण्यानं चेहरा धुऊन घ्या.
काकडी :
काकडीमध्ये ९५ टक्के पाण्याचा अंश असतो, त्यामुळे काकडी त्वचेचं मॉइश्चररायजेशन चांगल्या पद्धतीनं करू शकतं. काकडीचा रस चेहर्र्यावर आणि मानेवर ३0 मिनिटांपर्यंत लावून ठेवा.. त्यानंतर पाण्यानं चेहरा धुऊन घ्या. तसेच उन्हाळ्याच्या दिवसात उन्हापासून रक्षण करण्यासाठी काकडीचा रस चेहऱ्याला लावून बाहेर पडणे. काकडीची पेस्ट बनवून घ्यावी, त्यात थोडं दही मिसळून मानेवर लावल्याने मानेवरचे डाग दूर होतात.
कोरफड :
कोरफड हा सर्वोत्तम उपाय तुम्ही कधीही वापरू शकता. कारण त्वचा तेलकट असो वा कोरडी त्यासाठी कोरफड उपयोगी ठरतं. यामध्ये असणारे बीटा-कॅरोटिन, व्हिटॅमिन 'सी' आणि 'ई' त्वचेला स्वस्थ ठेवतात. यासाठी कोरफडीचा गर चेहऱ्याला लावून ठेवा.. आणि काही वेळाने धुऊन टाका.. मग पाहा, तुमच्या चेहऱ्याची चमक..पिंपल्स असेल तर कोरफडचा गर चेहऱ्यावर मसाज करणे, कोरफडने रंग गोरा होतो व चेहऱ्याला चमक येते. ज्यांच्या चेहऱ्यावर फार प्रमाणात पिंपल्स आहेत. त्यांनी आपल्या चेहऱ्यावर कोरफडच्या गराने फेशिअल करावा. कोरफडचा गर केसांना लावल्यास केसातील कोंडा कमी होतो व केसांना पण एक प्रकारची चमक येते.
लोणी :
लोणी काढल्यावर एक टेबलस्पून लोण्याने चेहरा, हात, गळा, डोळ्याच्या आजूबाजूनं मसाज करावा. मसाजची दिशा खालच्या बाजूने वरच्या बाजूला व आतून बाहेर अशी असावी.
दुध :
सकाळी दुध तापविण्यापूर्वी तीन ते चार टेबलस्पून दुध वातीत काढावे. ह्या दुधाने चेहरा, मान, गळा सर्व ठिकाणी चोळावे. घरगुती क्लिन्झिंग होऊन त्वचा साफ होते. या दुधात हळदीची चिमुट, ज्येष्ठमध, अनंतमूळ, चंदन, गुलाब, खस, मंजिष्ठ, नीम, संत्रासाल, तुळशी, पुदिना यापैकी एक पावडर अर्धा टेबलस्पून टाकून चेहऱ्याला लावावे. हे जमले नाही तर हळकुंड, चंदन इ. सहाणीवर उगाळावे. वाटल्यास त्यात बदाम उगाळावे, किंचित केशर टाकून दुधात मिसळून चेहऱ्यावर, मानेवर हातांना व गळ्याला चोळून लावावे. सुकले की चेहरा चोळून धुवावा.
उटणे :
मान स्वच्छ आणि नितळ ठेवण्यासाठी आठवड्यातून किमान एकदा उटण्याचा वापर करून मानेची त्वचा स्वच्छ करून घ्यायला हवी. मान स्वच्छ आणि नितळ ठेवण्यासाठी शक्यतो साबणाचा वापर करू नये.
एरंडेल तेल :
ज्यांचे केसांची घनदाटपणा कमी आहे त्यांनी एरंडेल तेलाने मालिश केली पाहीजे. यामुळे केस घनदाट आणि मजबूत होतात. याने मालिश केल्याने रक्तसंचार वाढतो आणि स्कैल्पला व्यवस्थित पोषण मिळते. तुम्हाला आठवड्यातून फक्त एकदा या तेलाने मालिश केली पाहीजे.
आवळा :
आवळ्याचा मुरांबा रोज खालल्यास दोन ते तीन महिन्यातच त्वचा गोरी होण्यास सुरुवात होते.
गाजर :
गाजराचा रस अर्धा ग्लास रिकाम्या पोटी सकाळी घेतल्यास एक महिन्यात रंग उजळायला लागतो.
दही :
दही skin moisturize करते. म्हणजेच चेहऱ्याचा ओलावा परत देते. मानेवर असलेला काळेपणा दूर करण्यासाठी आंबट दही मानेवर मालीश करायामुळे Skin चा काळेपणा दूर होईल.